| आगरदांडा | प्रतिनिधी |
कोकण उन्नती मित्र मंडळाचे वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय, बॅरिस्टर ए.आर. अंतुले कॅम्पस, मुरुड जंजिरा आणि इन्स्टिट्यूट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी करिअर समुपदेशन व सी ई टी परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ. जनार्दन कांबळे, अपस्केल एज्युकेशन अतुल जोशी, सौरभ सुभेदार, डॉ. श्रीशैल बहिरगुडे, डॉ. सुभाष म्हात्रे, डॉ. नारायण बागुल, डॉ. सीमा नाहिद, सहाय्यक प्राध्यापक सिद्धेश सतविडकर, रुफी हसवरे, प्रवेश पाटील आणि मुस्कान रज्जब, प्रा. प्रणव बागवे, चिंतन पोतदार, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जनार्दन कांबळे यांनी विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी योग्य मार्गदर्शनाचे महत्त्व सांगितले. एमबीए व वाणिज्य विषयाचे अभ्यासक सीईओ, अपस्केल एज्युकेशन- अतुल जोशी यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी, सीईटी परीक्षेची तयारी कशी करावी, कौशल्य विकास आणि शिक्षण क्षेत्रातील नवीन प्रवाह, याबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना मोठी प्रेरणा मिळाली. तर सौरभ सुभेदार यांनी व्यावसायिक अभ्यासक्रम, मॅनेजमेंट शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील अपेक्षा याबद्दल उपयुक्त माहिती दिली.







