करिअर कट्टा आर्थिक साक्षरता

। उरण । वार्ताहर ।

उरण वाणिज्य व कला महाविद्यालयांमध्ये करिअर कट्टा अंतर्गत तसेच सेबी यांच्या माध्यमातून आर्थिक साक्षरता या कार्यक्रमांतर्गत शेअर मार्केट कार्यशाळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील एकूण 78 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यापैकी 54 विद्यार्थ्यांना या कार्यक्रम यशस्वीरित्या ऑनलाईन पूर्ण करण्यामध्ये यश आले. विद्यार्थ्यांना बचत आणि गुंतवणूक कशी करावी, जर आपण छोट्या छोट्या प्रमाणात एसआयपी, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केल्या तर काही कालावधीनंतर मोठ्या प्रमाणात फायदा मिळू शकतो. तसेच, आपणास मिळालेले थोडे थोडेसे पैसे जर आपण एसआयपी सारख्या ठिकाणी किंवा आवर्ती ठेव योजनामध्ये जर गुंतवणूक केले तर छोटीशी गुंतवणूक भविष्यामध्ये फार मोठी होऊ शकते याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

Exit mobile version