| अलिबाग | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील कार्लेखिंड येथे दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला आहे. विनायक पाटील (30) रा. मुरबाड असे मृत व्यक्तिचे नाव आहे.
सदरचा अपघात हा सकाळी झाला. दुचाकीस्वार हा रात्री 12.30 च्या सुमारास ठाणे येथुन अलिबागकडे येण्यास निघाला असून, अलिबाग जवळील कार्लेखिंड येथे आले असता गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोयनाड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
विनायक पाटील हा ठाणे जिल्हयातील रहिवासी आहे. रविवारी रात्री बारानंतर तो त्याच्या दुचाकीवरून अलिबागकडे जाण्यास निघाला. पेण – अलिबाग मार्गावर प्रवास करत असताना कार्लेखिंड येथे आल्यावर अचानक त्याचा गाडीवरील ताबा सुटला. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला आदळून तो गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यावर त्याला बेशुद्ध अवस्थेत अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून तो अगोदरच मृत असल्याचे सांगितले. या अपघाताची नोंद पोयनाड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.