। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड या भारतातील अग्रगण्य विमा कंपनीचे मुंबई प्रधान कार्यालय स्पोर्टस क्लब अंतर्गत, कर्मचारी वर्गासाठी मुंबई क्षेत्रीय कॅरम स्पर्धा रोजी अलिबाग येथे हॉटेल रविकिरणमध्ये आयोजित करण्यात आली.
यावेळी क्षेत्रीय प्रबंधक गणेश करवाडेयांच्या हस्ते या स्पर्धेच उद्घाटन करण्यात आले. प्रधान कार्यालय स्पोर्टस क्लबचे अध्यक्ष दिनेश बोभाटे आणि सचिव मंगेश कदम यांचे मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे यजमानपद मुंबई क्षेत्रीय कार्यालय-5 यांनी भूषविले आहे. या स्पर्धेतील काही खेळाडू यांनी जिल्हा व राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे.






