पर्यटन विकासात कातळशिल्पांना प्राधान्य


| रत्नागिरी | वृत्तसंस्था |

कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्पांचे जतन, संरक्षण करून त्या ठिकाणी किमान आवश्यक सुविधा देऊन त्यांची योग्य प्रसिद्धी केल्यास पर्यटनक्षेत्राला वेगळी दिशा मिळेल. यादृष्टीने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हे डेस्टिनेशन म्हणून विकसित करताना कातळशिल्प ठिकाणांना प्राधान्य दिले जाणार आहे, अशी माहिती कातळशिल्प अभ्यासक व शासनाच्या स्वदेश दर्शन डेस्टिनेशन मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य सतीश लळीत यांनी नुकतीच गोरेगाव (मुंबई) येथे दिली.

मुंबईतील चिकित्सक समुहाच्या गोरेगाव येथील पाटकर-वर्दे महाविद्यालयात आयोजित केलेल्या कोकणातील कातळशिल्पेफ या सादरीकरणासह व्याख्यानात ते बोलत होते. चिकित्सक समुहाचे सहसचिव व विश्वस्त डॉ. गुरुनाथ पंडित यांनी पुष्पगुच्छ देऊन लळीत यांचे स्वागत केले. व्यासपीठावर प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड, मुख्य शिक्षण अधिकारी डॉ. माला खारकर उपस्थित होत्या. सविता धावडे यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय केला.

या दोन्ही जिल्ह्यांत सत्तरहून अधिक ठिकाणी पंधराशेहून अधिक कातळशिल्पे आढळली आहेत. अजूनही अज्ञात असलेली कातळशिल्पे उजेडात येत आहेत. गेल्यावर्षी मार्च महिन्यात युनेस्कोफ या जागतिक संस्थेने कोकणातील आठ व गोव्यातील एक अशा नऊ ठिकाणांचा समावेश जागतिक वारसा स्थळांफच्या तात्पुरत्या यादीत केला आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडोपीचा समावेश आहे. कुडोपी येथील बाहुल्यांचे टेंब या सड्यावर 80 हून अधिक कातळशिल्पे सापडली आहेत. खोटले-धनगरवाडी सड्यावरील कातळशिल्पे पाहण्यासारखी आहेत. अलीकडेच धामापूर-मोगरणे सड्यावरील शेजारी डुक्कर असलेल्या व हातात शस्त्र घेतलेल्या शिकारी माणसाच्या आतापर्यंतच्या पहिल्या कातळशिल्पाचा शोध मी लावला आहे.फफ

ते पुढे म्हणाले, केंद्राच्या स्वदेश दर्शनफ योजनेत सिंधुदुर्ग जिल्हा डेस्टिनेशनफ म्हणून जाहीर झाला आहे. जिल्ह्याचे पर्यटन सद्या केवळ समुद्रकिनाऱ्यांपुरते मर्यादित राहिले आहे; मात्र येथील गड-दुर्ग, मंदिरे, पर्यटन गावे, तलाव, खाड्या, बंदरे, लोककला, वेंगुर्ल्याच्या क्रॉफर्ड मार्केटफ यासारख्या कोकणी बाजारपेठांकडे अजून पर्यटन विकासाच्या दृष्टीने पाहिले जात नाही. आता यात कातळशिल्पांची भर पडली आहे. ही ठिकाणे विकसित केल्यास ती देशी व परदेशी पर्यटकांची आकर्षण केंद्रे होऊ शकतात. शासनाने नेमलेली डेस्टिनेशन मॅनेजमेंट कमिटी यादृष्टीने संपूर्ण जिल्हा हे डेस्टिनेशन म्हणून आगामी काळात विकसित होण्यासाठी आराखडा बनवित आहे. कमिटीचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी या विषयाला प्राधान्य दिले असून, नुकत्याच झालेल्या समितीच्या पहिल्या बैठकीत पर्यटन विकासाची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

कातळशिल्पांचे जतन, संवर्धन आवश्यक
कातळशिल्प ठिकाणे ही आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थान होऊ शकते,  मात्र जतन, संरक्षण, सुविधा आणि प्रसिद्धी याचा परिणामकारक वापर केल्यास पर्यटक मोठ्या संख्येने त्याकडे वळतील. यामुळे पर्यटनक्षेत्रांच्या विकासाबरोबरच स्थानिक नागरिकांचा आर्थिक विकास होण्यास हातभार लागेल, असे मत यावेळी लळीत यांनी व्यक्त केले.
Exit mobile version