| पनवेल | वार्ताहर |
तलाक, तलाक, तलाक असे बोलून तलाक दिला म्हणून पतीविरोधात मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण प्रमाणे खारघर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
संबंधित महिला तळोजा फेस-1 येथे पती आणि मुलांसह राहतात. त्यांच्या पतीचे दुसर्या महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याने विचारणा केली असता तो तिला मारहाण करत असे. चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक व मानसिक त्रास देत असे. त्यानंतर पीडित महिलेने सीबीडी बेलापूर पोलिस ठाण्यात पतीविरोधात तक्रार दिली. त्यानंतर महिला सहायता पक्ष येथे समुपदेशनाची सुनावणी चालू होती. डिसेंबर महिन्यात पीडित महिला खारघर येथील कॉलेजमध्ये नोकरीसाठी गेली होती. यावेळी तिथे ओळखीचे लोक हजर असताना अचानक पती आला व त्याच्यासोबत एक काझी, दोन इस्लामी वकील व सोबत साक्षीदार असे होते. ही माझी पत्नी असून, मी तुम्हा सर्वांना साक्षी ठेवून तलाक देतो असे बोलून तलाक दिला.