| कल्याण | प्रतिनिधी |
महावितरणकडून वारंवार आवाहन करूनही आकडे टाकून अथवा वीज मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या कोनगाव परिसरातील आठ वीज ग्राहकांना महावितरणने दणका दिला आहे. या वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डिसेंबर 2025 मध्ये महावितरणच्या टिटवाळा उपविभाग अंतर्गत कोनगाव शाखा अंतर्गत ग्राहक तपासणी मोहिम राबविण्यात आली. यात एकूण विजचोरीचे 8 प्रकरणे उघडकीस आली असून 27399 युनिट्सची विजचोरी व सुमारे 6 लाख 61 हजार इतक्या रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात आली. विजचोरी प्रकरणी ग्राहकांवर सहाय्यक अभियंता धनंजय पाटील यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनंतर शांतीनगर पोलीस स्टेशन भिवंडी येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महावितरण कल्याण परिमंडळ मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा, मंडळ अधीक्षक अभियंता विजय फुंदे, कार्यकारी अभियंता विनय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विजचोरीला आळा घालण्यासाठी व विजहानी कमी करण्यासाठी टिटवाळा उपविभाग अंतर्गत कोन शाखा येथे ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत कोन शाखा अंतर्गत वॉटर सप्लाय रोड, पाचमार नगर, तरीपार या परिसरातील 8 विजग्राहकांवर विजचोरी बिल न भरल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या मोहिमेत टिटवाळा उपविभाग अंतर्गत उपकार्यकारी अभियंता गणेश पवार, सहाय्यक अभियंता निलेश शिर्के, तुकाराम घोडविंदे, सहाय्यक अभियंता धनंजय पाटील, सचिन पवार, योगेश चेंदवणकर तसेच कोन शाखा विज कर्मचारी यांनी भाग घेतला.
वीजचोरी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
