सिडकोकडून चार डंपरचालकांविरोधात गुन्हा दाखल
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
सिडको महामंडळाने संपादित केलेल्या तसेच संपादित करण्यात येत असलेल्या जमिनीवर/भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे डंपर वाहन चालकाकडून डेब्रिज टाकण्यात येत असून, ते मानवी आरोग्यास धोकादायक व पर्यावरणास हानिकारक असल्याचे निदर्शनास आले आहे. याविरोधात करण्यात आलेल्या कारवाईत चार डंपरचालकांविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, अनधिकृत डेब्रीजला आळा घालण्याच्या दृष्टीने मुख्य दक्षता अधिकारी, सिडको यांच्या नेतृत्वाखाली दक्षता तपास अधिकारी, सुरक्षा विभाग, अभियांत्रीकी विभाग व पोलीस विभाग यांच्यासह दि. 22 जुलै रोजी सिडको कार्यक्षेत्रात मोहीम राबवत असताना संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास डंपर क्रमांक एमएच 43 सीई 3254 वरील चालक रमेश किसन पवार, 37, रा. हनुमंत वाडी, ता. निलंगा, जि. लातूर, डंपर क्रमांक एमएच 03 ईजी 9910 वरील चालक साजीद अली साकीर अली, 38, रा. व्हीलेज नेत्रीकला, उत्तरप्रदेश, डंपर क्र.एमएच 04 एलवाय 7876 वरील चालक संजय चांदोबा कांबळे, 50, रा. वाशी गाव, नवी मुंबई, डंपर क्र. एमएच 03 ईएस 8647 या डंपरवरील चालकावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, उलवे जासई, परिसरात आरोग्यास हानिकारक डेब्रिज खाली करण्यासाठी जाण्याच्या प्रयत्नात असताना वाशी टोलनाका नवी मुंबई येथे मिळून आले. त्यांच्याविरुध्द वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







