| उरण | प्रतिनिधी |
उरण मधील चिर्ले येथे डेब्रिज टाकणाऱ्या मुंबई मधील दोन वाहन चालकांना प्रत्यक्ष जागेवर पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशानुसार सुरक्षा रक्षक तसेच भरारी पथक कारवाई गस्त करीत असताना कार्यकारी अभियंता राजीव कोलप यांच्या सुचनेनुसार बेकायदेशीर डेब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
अटल सेतुजवळ ब्रिज जेथे संपतो त्याठिकाणी चिर्ले येथे डेब्रिज टाकणारे वाहन असल्याची माहीती प्राप्त झाल्यानंतर सदर डेब्रिज टाकणारे वाहनांवर कारवाई करा असे आदेश मिळाल्यानंतर अटल- सेतु ब्रिज संपतो त्या ठिकाणी चिर्ले दरम्यान भरारी पथक पोहोचले असता डंपर हे सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रातील जागेत डंपरमधील डेब्रिज अनधिकृतपणे वाहतुक करून डेब्रीज टाकत असताना आढळून आले. सदर डंपर वरील चालकास भरारी पथकाने थांबवून त्यांचे नाव विचारले असता चालक महेश बाबु कुंभार असे सांगितले तर चालक याने त्याचे नाव शकीर सज्जद अली असे सांगितले. त्यांनतर भरारी पथकाने सुरक्षा जवान यांना बोलावून त्यांच्या मदतीने दोन्ही डंपर जासई पोलीस चौकी येथे आणून उभे केले आहेत. अटल सेतु ब्रिज संपतो त्या ठिकाणी चिर्ले येथे आरोपी डंपर चालक यांनी डेब्रिज अनाधिकृतपणे वाहतूक करून ये- जा करणाऱ्या तसेच स्थानिक लोकांच्या आरोग्यास व जीवितास हानी होईल अशा बेकायदेशीर व बेजबाबदार पद्धतीने टाकून सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रातील जागेचे विद्रुपीकरण करण्यास बेजबाबदारीचे कृत्य करणेस कारणीभूत झाले म्हणून भरारी पथकाने चालकांवर कायदेशीररित्या गुन्हा नोंदविला आहे.
दोन डंपर चालकावर गुन्हा दाखल
