विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात 29 सप्टेंबर रोजी करण्यात आला. 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास फिर्यादी हे अन्न टाकण्यासाठी गेले असता सेक्टर 35, खारघर तलावाच्या बाजूला बसलेला अनोळखी इसम सिगारेट ओढत होता. यावेळी त्याला सिगारेट पिऊ नको असे सांगितले असता त्याने फिर्यादी आणि त्यांची पत्नी यांच्यासोबत भांडण केले. आणि दगडाने मारहाण करून शिवीगाळ केली तसेच फिर्यादी यांच्या पत्नीचा विनयभंग गेला.

Exit mobile version