पनवेल | वार्ताहर |
राहत्या गाळ्याच्या उघड्या शटरद्वारे अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करुन त्याठिकाणी असलेले मोबाईल फोन व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना पनवेल तालुक्यातील वावंजे येथे घडली आहे.
सरिफुल्ला अफिजुल्ला चौधरी (26) यांचे रेहमान नगर सुन्नी मजिद जवळ वावंजे या ठिकाणी गाळा असून, त्याठिकाणीच ते राहतात. सदर ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून त्याठिकाणी असलेले दोन मोबाईल फोन व रोख रक्कम 19 हजार असा मिळून जवळपास 34 हजारांचा ऐवज चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.