| लखनौ | वृत्तसंस्था |
उत्तरप्रदेशात आम्ही सत्तेत आल्यास तीन महिन्यात जातीनिहाय जनगणना करणार असे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी जाहीर केले.दरम्यान, आणखी एका भाजपा नेत्याने समाजवादी पार्टीत प्रवेश केला. माजी मंत्री दारा सिंह चौहान यांचं अखिलेश यादव यांनी पक्षात स्वागत केलंय. नुकतेच उत्तर प्रदेश सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्री पदाचा राजीनामा देणारे दारा सिंह चौहान आणि भाजपाचे सहयोगी अपना दल (सोनेलाल) चे आमदार डॉ. आरके वर्मा यांनी रविवारी त्यांच्या समर्थकांसह समाजवादी पक्षात प्रवेश केला. सपा मुख्यालयात माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल यांनी दारा सिंह चौहान आणि प्रतापगड जिल्ह्याचे आमदार आरके वर्मा यांच्या समर्थकांसह पक्षात सामील होण्याची घोषणा केली.







