| सुतारवाडी | प्रतिनिधी |
कामत या ग्रामीण भागामध्ये पिसाळलेला कुत्रा गुरांना चावल्यामुळे चार गुर दगावल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की कामत परिसरामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने मोकाट गुरांना चावा घेतल्यामुळे चार गुर दगावली असून, त्यामध्ये दोन गाई व बैलांचा समावेश आहे. सुतारवाडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नव्यानेच रुजू झालेले पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत माळी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली असता या प्राण्यांचा मृत्यू पिसाळलेला कुत्रा चावल्याने झाल्याचे निदर्शनास आले. एका गाईच्या पोटात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक असल्याचे ऑपरेशननंतर निदर्शनात आले. डॉ. चौकशी केली असता ही गुर मोकाट असल्याचे समजले. मृत पावलेल्या गुरांचा जनतेला त्रास होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी मृत पावलेल्या गुरांना जेसीपी द्वारे तेथून हटवून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली.
कामत येथे श्वान दंशाने गुरे दगावली

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606