| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा तालुक्यात पडत असलेल्या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील घरांची, संरक्षण भिंत व शेतीचे बांधबंदिस्तीची पडझड झाली आहे. त्यातच मंगळवारी (दि.19) रात्री मुसळधार पडणाऱ्या पावसात पांगलोळी येथील शेतकरी गणू मांढरे यांचा गुरांचा गोठा जमीनदोस्त झाला आहे. तसेच, पानवे बौद्धवाडी येथे पाणी साठवण टाकीची भिंत बांधकाम कोसळली आहे. म्हसळा तालुक्यात आतापर्यंत 16 पक्क्या घरांची अंशतः तर 8 कच्च्या घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे. तीन ठिकाणी संरक्षण भिंत बांधकाम कोसळले आहे. एका ठिकाणी शेतीचे बांध फुटले असल्याची नोंद म्हसळा महसूल विभागात नोंद केली असल्याची माहिती महसूल विभाग अधिकारी महेश रणदिवे यांनी माहिती देताना सांगितले आहे.






