| उरण | वार्ताहर |
पनवेल-उरण तालुक्यात गुरे चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली असून तालुक्यातील बहुतांश गावातील नागरिकांची गुरे चोरीला गेल्याची घटना घडत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तालुक्यातील नागरिकांची गुरे चोरी होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.आतापर्यंत कित्येक गुरे चोरीला गेली आहेत. परंतु आपली गुरे भरकटली असतील आज ना उद्या ती परत येतील या आशेमुळे नागरिकांनी तक्रार दाखल करणे टाळले.
केळवणे-पुनाडे रस्त्यावर काही माणसे टेम्पोमध्ये एका वासराला भरत असताना मंगळवारी (दि.30) रात्रीच्या सुमारास कामावरून येणाऱ्या ऋषिकेश डाकी या कामगारांनी पाहिले. त्यानी जीवाच्या भीतीने त्यांना काही न विचारता तो निघून गेला. एकंदरीत उरण शहरातील यशश्री शिंदेंच्या घडणे नंतर संपूर्ण पोलीस यंत्रणा त्या घटणेमुळे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपले लक्ष केंद्रित करत असल्याने गुरे चोरणार्या टोळीला गुरे चोरणे सोपे झाले आहे. तरी शेतकर्यांनी देखील आपली गुरे मोकाट न सोडता व्यवस्थित गोठ्यात बांधून ठेवावीत अशी विनंती हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे.






