गारव्यासाठी पाणवठ्याचा आधार

। रसायनी । वार्ताहर ।

उन्हाच्या झळा अधिकच जाणवू लागल्याने मुक्या प्राण्यांना पाण्यात गेल्याशिवाय गारवा मिळत नाही. म्हणून गुरेढोरे उन्हाच्या त्रासामुळे गारवा मिळण्यासाठी डबक्याचा आधार घेताना दिसत आहेत. मुके प्राणी पाण्यात राहून आपले शरीर थंड करण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. रसायनी पाताळगंगा परिसराच्या काही ग्रामीण भागात जनावरे झाडाखाली बांधली जातात. पंरतु, सावली एका ठिकाणी स्थिर नसल्याने याचा फटका मुक्या प्राण्यांना बसल्याचे दिसून येते. उष्म्याचा पारा अधिकच वाढल्याने मुक्या जीवांच्या कळा वाढत आहेत.

Exit mobile version