अलिबाग सायकल क्लबचा उपक्रम
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग सायकल क्लब तर्फे कार्लेखिंड येथील पात्रु देवी मंदिर परिसरात सीसीटीव्ही प्रदान करण्यात आले. आनंद कोळगावकर यांचे अध्यक्षतेखाली अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस निरीक्षक सणस यांच्या प्रमुख उपस्थितीत हे सीसीटीव्ही कॅमेरे प्रदान करण्यात आले. सायकल क्लबच्या एव्हरेस्टिंग पॉईंटच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
दोन महिन्यापूर्वी पात्रूदेवी मंदिरात झालेल्या चोरीचा छडा अवघ्या दोन दिवसात लावल्याबद्दल अतुल झेंडे, पोलीस निरीक्षक सणस, अलिबाग सायकल क्लबचे संस्थापक आनंद कोळगावकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. खाडिलकर, संतोष तावडे यांनी अलिबाग सायकल क्लबच्या वतीने आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे व्यवस्थापन व नियोजन मुकुंद म्हात्रे, सुमंत रायकर, बिपिन लेहुवा आणि अलिबाग सायकल क्लबच्या सदस्यांनी केले.
यावेळी गोठेघर सरपंच प्रफुल्ल पाटील, पोलीस पाटील मनोज पाटील, कुकुचकु पोल्ट्री फार्मचे मालक कुणाल पाथरे, मंदिराचे गुरव मंगेश घरत व्यासपीठावर उपस्थित होते. सूत्रसंचालन अलिबाग सायकल क्लबचे सदस्य श्री. दत्तात्रय पोतदार यांनी केले.
