वेळास येथे कृषी दिन साजरा

शेतकऱ्यांचा सन्मान; शेतीसाठी अवजारांचे वाटप

अलिबाग । शहर प्रतिनिधी ।

कृषीदिनाचं औचित्य साधुन वेळास येथे धवळ तवसाळकर व मित्रंमंडळाने मिळुन आज वेळास येथील शेतकऱ्यांचा गुलाबपुष्प देवुन सन्मान केला.त्याच बरोबर शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी जे शेतकरी शेती करतायत त्यांना शेतीची अवजारे देखील वाटप करण्यात आली. या उपक्रमागाचा उद्देश असा की, जे शेतकरी आज शेती कडे पाठ फिरवत आहेत त्यांनी देखील पुन्हा शेतीकडे वलुन गावाला सुजलाम सुफलाम करावं व पुर्वीचा जो नैर्सगिक सौंदर्य होता तसाच सौदंर्य तरुण पिढीने पहावा व त्यांनी देखील शेतीकडे चांगल्या नजरेने पाहवं व शेतीकडे वळावं.

महाराष्ट्रात १ जुलै हा कृषी दिन म्हणुन साजरा केला जातो. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा हा जन्मदिवस यांनी महाराष्ट्राच्या कृषीक्षेत्रात अमुलाग्र बदल करुन महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला वेगळ्या पातळीवर नेले. त्यांच्या या कार्यांचा उजाळा म्हणुन राज्यात 1जुलै ते 7 जुलै हा सप्ताह कृषी सप्ताह म्हणुन साजरा केला जातो.

त्याच बरोबर शेतकऱ्यांना देखील महाघाईचा फटका बसतं आहे सतत वाढत असलेले नांगरणी,खुरपणी चे खर्च त्याचं बरोबर अशीच शेती संबंधीची कामे या सर्वांचा विचार करता धवल तवसाळकर यांनी पुढील वर्षी वेळास मध्ये जो कोणी शेती करेल त्याला नांगरणी साठी मोफत ट्रॅक्टर उपलब्ध करुन देईन असे आश्वासन दिले व यामुळे शेती करण्याचे प्रमाण वाढले अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला संदीप दिवेकर, सचिन दळवी, प्रकाश दिवेकर, दिपक दरगे, दिपक वाजे, प्रदीप मुरकर, नाना पाटील व सर्व ग्रामस्थ व शेतकरी वर्ग उपस्थित होते.

Exit mobile version