शांतता सलोखा राखत ईद, अक्षयतृतीया साजरी करा

| पनवेल । वार्ताहर ।

रमजान ईद आणि अक्षय तृतीया सणानिमित्त निमित्त पनवेल शहर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल शहरातील मशीद ट्रस्टी व मौलाना यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी भागवत सोनावणे यांनी उपस्थितांना सूचनापर मार्गदर्शन करून रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

या बैठकीला सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे यांच्यासह दिलीप शिंदे, संजय धारेराव, गौतम भोईर, भाऊसाहेब लोंढे, किरण सोनावणे यांच्यासह शहरातील मशीद ट्रस्टी व मौलाना, शांतता कमिटी सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version