गणेशोत्सव शांततेत साजरा करा

 भाकरवड | वार्ताहर |
पोयनाड पोलीस ठाण्यातील कार्यक्षेत्रांतील नागरिकांना गणेशोत्सव सण साजरा करण्या करिता शासनाने दिलेल्या माहितीनुसार उत्स्फूर्तपणे तथा शांततेने साजरा करण्याचे आवाहन  एपीआय  राहुल अतिग्रे यांनी केले आहे.
पोयनाड पोलीस ठाण्याचा भाग मोठा असल्याने मानकुळे ते सांबरी खारेपाट पट्ट्यातील असून, त्या त्या ठिकाणी जाऊन शांतता कमिटीच्या माध्यमातून मिटींग द्व्यारे सर्वाशी संवाद ,हितगुज करून येणारा गणेशोत्सव सण कशा पद्धतीने साजरा करता येईल याची उपाययोजना करून सर्वांना सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती अतिग्रे यांनी दिली.
पोयनाड  बाजारपेठमध्ये  वाहतुकीवर कसे नियंत्रण ठेवता येईल याची आखणी करून पोलीस कर्मचारी, होमगाड  तसेच ट्राफिक हवालदार  तैनात करण्यात आले आहेत. गणेशोत्सवासाठी येणार्‍या गणेश भक्तांना प्रवासा दरम्यान कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी वाहतूक नियंत्रण व्यवस्था तसेच भाकरवड गावचे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार श्री जीवन दत्तात्रेय पाटील यांनी भक्तांच्या सेवेसाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था पेझारी चेकपोस्ट दरम्यान ठेवली असल्याची माहितीही त्यांनी दिली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सेनेटायझर मास्क व सुरक्षित अंतर ठेवून काळजी घ्यायची आहे यावेळी सुद्धा आरोग्य यंत्रणा , सफाई कामगार, आदींनी अथक परिश्रम घेवून कोरोना महामारीस प्रतिउत्तर देण्यासाठी सज्ज झाली आहे गणेशोत्सव समिती स्थापन करण्यात आली असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तसेच घरगुती गणेशोत्सव शांतपणे उत्साही वातावरणात साजरा करण्याचे आवाहन श्री राहुल अतिग्रे यांनी यावेळी केले आहे.

Exit mobile version