। पेण । वार्ताहर ।
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेबर2021 या कालावधीत संपूर्ण भारतभर जागरूकता आणि संपर्क अभियानाचे आयोजन मा.राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मा.उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे करण्यात येत आहे. या अभियानाच्या अंतर्गत 9 नोव्हेबर रोजी दिवाणी न्यायालय क. स्तर पेण येथे विधी सेवा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहदिवाणी न्यायाधीश पी.सी देशपांडे यांनी तालुका विधी सेवाचे कार्य, भारतीय सविधानाने नागरिकांना दिलेले हक्क या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सरकारी वकिल सतिष नाईक यांनी विधी सेवा प्राधिकरणा मार्फत कोणाला व कशा प्रकारे सहाय्या मिळु शकते या बाबत त्यांनी उपस्थितीना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड. गणेश म्हात्रे यांनी केले. सदर कार्यक्रमात पेण बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. एन.म्हात्रे, वकीलवर्ग, पेण न्यायालयातील कर्मचारी, पोलीस कर्मचारी, पक्षकार उपस्थित होते.