आवास येथे पर्यटन दिन साजरा

व्यवसायिकांसाठी अभिषेक नाईक यांचे मार्गदर्शन
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्था, अलिबाग-रायगड आणि लायन्स क्लब मांडवा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त सोमवारी (27 सप्टेंबर) रोजी शिवांजली हॉलीडे होम, आवास, अलिबाग येथे पर्यटन व्यवसायिकांसाठी ’हाऊसकीपिंग’ यासंदर्भात मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, अलिबागचे प्राचार्य अभिषेक नाईक यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्था, अलिबाग-रायगडचे अध्यक्ष निमिष परब, लायन्स क्लब मांडवाचे अध्यक्ष मोहन पाटील, शिवांजली हॉलीडे होमचे संचालक आमिष शिरगावकर, मुकुंद संसारे, नितीन नाईक, आल्हाद जाधव, सुधीर पूरव, मनोज घरत, बाबू राणे, आशिष शिरगावकर, स्वाती बर्वे, जितेंद्र ठाकूर, नितीन अधिकारी, हर्षद पाटील, सुमीत पाटील, अजय अंगणे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आपल्या व्याख्यानात प्राचार्य अभिषेक नाईक यांनी पर्यटन व्यावसायिक आणि पर्यटक यांच्यामध्ये आपुलकीचे संबंध निर्माण होणे गरजेचे असल्याचे सांगितले. हे आपुलकीचे संबंध चांगले आतिथ्य केल्याने होते. पर्यटक वारंवार यावा यासाठी पर्यटन व्यावसायिकांनी स्टँडर्ड निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. तसेच पर्यटन व्यवसायिकांनी स्वीमिंगपुलाव्यतिरिक्त इतरही खेळाच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्यास पर्यटकांना त्या-त्या कॉटेज, रिसॉर्ट, हॉलीडे होममध्ये वारंवार यावेसे वाटेल., असे अभिषेक नाईक यांनी सांगितले तसेच याबाबत सविस्तर माहिती दिली.अखेर अमिष शिरगावकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.

Exit mobile version