जागतिक मलेरिया दिन साजरा

।नवी मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, एडीएचएस-मुंबई विभागातर्फे 25 एप्रिल 2022 रोजी डॉ. बाळासाहेब सोनवणे, आरोग्य सेवा (मलेरिया) मुंबई विभागाचे सहाय्यक संचालक यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली एनजीओ हार्ट फाऊंडेशन आणि अपोलो हॉस्पिटल्स यांच्यासमवेत जागतिक मलेरिया दिनाचे वाशी-नवी मुंबई येिील विष्णुदास भावे सभागृहात आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. स्वप्नील लाळे, संचालक, डॉ. गौरी राठोड, उपसंचालक, मुंबई विभाग, डॉ. जयकर एलिस, अध्यक्ष, हार्ट फाऊंडेशन, डॉ. किरण शिंगोटे, युनिट हेड अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई, डॉ. रविकुमार आणि डॉ. भालचंद्र पेडंबकर, ओवेन्स क्राउनिंग आदी उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे डॉ. स्वप्नील लाळे यांनी आपल्या भाषणात मलेरिया रोगाचा भार कमी करण्यासाठी नवोपक्रमाचा उपयोग करा आणि जीव वाचवा या घोषवाक्याची थीम स्पष्ट केली. त्यांनी सर्व आरोग्य कर्मचार्‍यांना मलेरियाचे निर्मूलन कसे करावे, संक्रमण कमी करण्यावर भर द्यावा आणि मृत्यूचे प्रमाण कमी कसे करावे, याबाबत मार्गदर्शन केले. भविष्यात अधिक चांगल्या कामगिरीसाठी डिजिटल मायक्रोस्कोप प्रदान करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. 2030 पर्यंत मलेरियाचा नायनाट करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमासाठी एनजीओने दिलेल्या देणगीचेही त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तरुलता धानके यांनी केले.

Exit mobile version