| रसायनी | वार्ताहर |
ग्रामीण रुग्णालय चौकच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. सविता कालेल यांच्यावतीने आणि आई बाबा फाऊंडेशनचे प्रवीण नवरे यांच्या माध्यमातून तंबाखू विरोधी दिवस, दंत चिकित्सा आणि आरोग्य तपासणी करण्यात आली.
ग्रामीण रुग्णालय चौक वैद्यकिय अधिक्षक डॉ. सविता कालेल व ग्रामीण रुग्णालय यांनी आसरे येथिल आई बाबा फाऊंडेशन येथिल 280 सुधारित रुग्णांची तपासणी केली. यावेळी येथे तंबाखू विरोधी दिवस पाळण्यात येऊन सर्व रुग्णांची दंत चिकित्सा डॉ. राजन यादव यांनी केली. डॉ. राजन यादव यांनी मुखाचा कर्करोग, घशाचा कर्करोग, गर्भाशय कर्करोग, तंबाखूचे दुष्परिणाम याबद्दल सविस्तर माहिती दिली. 67 रुग्णांचे सिबीसी, थायरॉईड, शुगर, एड्स तपासणी, सिकलेस, एचआयव्ही तपासणी करून औषध देण्यात आली. यावेळी तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली.
यावेळी रुग्णांच्या प्रश्नांची अचूक उत्तरे डॉ. राजन यादव यांनी दिली. प्रयोगशाळा तंत्रज्ञ विकास झुमरे यांनी सर्वांची रक्त तपासणी केली. समुपदेशक अशोक लोंढे यांनी एचआयव्ही संदर्भात माहिती दिली.