सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा

| उरण | वार्ताहर |

सारडे विकास मंच अध्यक्ष तसेच कोमनादेवी ऑक्सिजन पार्कचे निर्माते नागेंद्र म्हात्रे यांचा वाढदिवस मित्र परिवारातर्फे साजरा करण्यात आला. यामध्ये श्रावणी सोमवार आरती समूह आवरे निवास गावंड आणि विराट पाटीलतर्फे मर्दनगड येथे वृक्षारोपण तसेच राजिप शाळा आवरे येथे आयजीएल कंपनीतर्फे दोन घड्याळ तसेच मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

राजिप शाळा पाले येथे उपेंद्र ठाकूर यांच्या तर्फे 41 विद्यार्थ्यांना ओळखपत्र आणि खाऊ वाटप करुन राजिप शाळा गोवठणे आणि पुनाडे आदिवासी वाडी येथे सदाबहार दोस्ती ग्रुप प्रतिष्ठान उरणतर्फे खाऊ वाटप करण्यात आले. राजिप शाळा सारडे येथे एयजीएल कंपनी तर्फे सहा घड्याळ, एक फॅन व खाऊ केले. राजिप शाळा चांदायले वाडी रानसई येथे प्रवीण पाटील यांच्यातर्फे मुलांना जेवण आणि खाऊ वाटप, राजिप शाळा चिरनेर अक्कादेवी वाडी सन्नी बोरसे यांच्यातर्फे जेवण, फॅन आणि खाऊ वाटप कार्यक्रमास सदाबहार दोस्ती ग्रुप प्रतिष्ठानचे हरिश्‍चंद्र म्हात्रे, संतोष जोशी, कामेश्‍वर म्हात्रे, विजय म्हात्रे, प्रदीप वर्तक, मिलन पाटील या सहकारी वर्गांच्या सहकार्याने नागेंद्र म्हात्रे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सर्व सहकारी वर्गाने किशोर पाटील प्रस्तुत ‘स्वर हे माझे’ संगीत कार्यक्रमाचे आयोजन हॉटेल एमडीएस सारडे येथे करून मोठ्या जल्लोषात नागेंद्र म्हात्रे यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी नागेंद्र म्हात्रे यांनी सर्वांचे आभार मानले.

Exit mobile version