चिमणी दिवस साजरा

| उरण । वार्ताहर ।
करंजा येथील द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम विद्यालयात जागतिक चिमणी दिवस सोमवार (दि.20) रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवसानिमित्त विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी या दिवसानिमित्त गाणी सादर केली तसेच या दिवसाचे महत्त्व सांगणारी घोषवाक्य लिहून आणली होती तसेच विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली. आपल्या घराच्या आसपास, अंगणात चिमण्या येतात त्या वेळी त्यांना दाणे टाकणे व पाणी देणे या विषयीची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

या दिवसाचे औचित्य साधून इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी चिमण्यांसाठी 165 कृत्रिम घरटी तयार तयार करून आणली होती ही घरटी शाळेच्या आजुबाजुच्या परिसरातल्या झाडांवर लावण्यात आली. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची प्रश्‍नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

Exit mobile version