ईको फ्रेंडली महिला पतंगोत्सव साजरा

| पेण । वार्ताहर ।
या पतंगोत्सवात चढाओढ नाही म्हणून पतंगाची कापाकापी नाही,म्हणून हानीकारक मांजाही नाही. कागदाचे रंगबेरंगी पतंग उडवताना पक्षांची घरट्यात येण्याची वेळेही पाळली जाते. महिलांना सामाजिक सुरक्षा मिळावी व त्याच बरोबर सर्व जनतेस रस्त्यावर ही सुरक्षा मिळावी या करीता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पेण यांचे सोबत हा महिला पतंगोत्सव साजरा करीत आहोत असे प्रतिपादन जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ.वैशाली पाटील यांनी केले.

त्या अंकुर ट्रस्ट, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व महिला अत्याचार विरोधीमंच यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित 10 व्या महिला पतंगोत्सवाच्या कार्यक्रमात बोलत होत्या. या वेळेस डेप्युटी आर.टी.ओ. महेश देवकाते, माधव सुर्यवंशी, डॉ. रूपेश पाटकर, किरण पाटील, अँड. मंगेश नेने, ज्योती वाघ, मोहन जोशी आदी उपस्थित होते. रंगबेरंगी हातात पतंग घेऊन महात्मा गांधीमंदीरपासुन वाजत गाजत निघालेल्या महिलाच्या रॅलीत सुमारे पाचशे मुली व महिला उपस्थित होत्या. 2013 च्या निर्भया बलात्कार प्रकरणा नंतर सुरू झालेल्या महिला अत्याचार विरोधीमंच हा पतंगोत्सव दर वर्षी पेणकराचेच नाही तर राज्याचा सगळ्यात पहिला महिलांचा दहा वर्षापासूनचा पतंगोत्सव सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा होता.

या वर्षी अंकुर ट्रस्ट, पतंगराव कदम कॉलेज इतिहास विभाग, आदिवासी विकास विभाग च्या वसतिगृहातील विद्याथीनी,चाईल्ड हेवन,आशा किरण हायस्कूल, आई डे केअर, सावरसई आश्रम शाळा च्या विद्यार्थिनींनी आकर्षक नुसते नृत्य,नाटीकाच केल्या नाही तर वंचित घटकातील महिलावर्गात सामाजिक सुरक्षिततेचा संदेश ही दिला. सदर कार्यक्रमाचे स्वागत कविता पाटील यांनी केले तसेच सूत्रसंचालन निता कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन शैला धामणकर यांनी केले.

Exit mobile version