रायगड डाक विभागाचा ‘पहिलाच क्रीडा महोत्सव’ साजरा

| श्रीवर्धन | वार्ताहर |

नियमित जनतेची सेवा देत कामात गुंतून राहणाऱ्या डाक विभागाच्या कर्मचारीवर्गाला अनोख्या पद्धतीने ऊर्जा देण्यासाठी श्रीवर्धन येथे मैदानी खेळांचे आयोजन करून रायगड डाक विभागाचे अधीक्षक श्री सुनील थळकर यांनी आपल्या कर्मचारी वर्गाला सुखद अनुभव दिला. प्रत्येक व्यक्तिने सदृढ राहण्यासाठी स्वतास जमणारा व्यायम केल्याने शरीराबरोबर मन ही तजेलेदार राहते, त्यामूळे नियमित कामात ऊर्जा प्राप्त होते अशी भावना असणारे श्री सुनील थळकर वय 55 असताना ही स्व:ता धावणे, चालणे, गिर्यारोहण, सायकलिंग अशा स्पर्धेत सहभागी होत, तरुणांना पुढे आदर्श निर्माण करत असतात. त्यामुळेच त्यांनी कर्मचारीवर्गात मैदानी खेळाचे आकर्षण निर्माण व्हावे त्याचे प्रतिबिंब त्यांच्या दरोरोजच्या कामकाजातून दिसावे या हेतूने सुंदर नियोजन करून श्रीवर्धन समुद्र किनारा व र.ना. राऊत विद्यालयचे मैदान या ठिकाणी रायगड डाक विभागातील कर्मचारीवर्गासाठी ‘क्रीडा महोत्सव’ प्रथमच साजरा केला.

त्या ठिकाणी क्रिकेट सामने, 3 किलो मीटर, 1 किलो मीटर, 100 मीटर रनिंग यामध्ये वय 45 वरील व वय 45 खालील असे वयाप्रमाणे विविध गटात या स्पर्धा खेळवल्या गेल्या, तसेच महिला व मुली यासाठी लंगडी आणि फनी गेमचे ही आयोजन केले गेले. यास महिला कर्मचारीवर्गाचा उत्तम प्रतिसाद लाभला. त्याही पेक्षा जास्त प्रतिसाद क्रिकेट सामन्यास लाभला 8 संघात 3, 3 षटकाच्या झालेल्या स्पर्धेत विजेते माणगांव चैलेंजर्स व उपविजेते श्रीवर्धन सुपर जायंट्स झाले. मेन ऑफ दि सिरिज पारितोषिक श्री माधव मुंडे, बेस्ट अष्टपैलू पारितोषिक श्री आदेश पाटील यांनी मिळवले. मैदानी स्पर्धेमध्ये अनुक्रमे 3 किलोमीटर रनिंग मध्ये मोठागट श्री हरीचंद्र भायदे, श्री सुनील थळकर, श्री रवींद्र घरत व लहान गटात राहुल नरद, सचिन, आशीष कौशिक विजयी झाले. 100 मीटर रनिंग मध्ये मोठ्यागटात श्री रवींद्र घरत, श्री सुनील थळकर, श्री राम एरुनणकर लहान गटात आदेश पाटील, अनुज कुमार, जयवंत कुंभारे यांचा क्रमांक आला. महिलांच्या स्पर्धेत अनुक्रमे 1 किलोमीटर चालणे मोठा गट सुषमा साळूखे, सगुणा शेट्टी लहान गट माधवी खंडेलोट, ममता महाडीक लंगडी स्पर्धेत अश्विनी पांचाल, सुषमा साळूखे, आराधना तळेगावकर यांनी क्रमांक मिळवला. फनीगेम मध्ये पूजा गोरेगावकर, सीमा पिपळे, सरोज रूमडे, वैशाली तोंडणकर या विजयी झाल्या. सोबत आलेल्या सर्व महिलावर्गाचा भेटवस्तु देऊन सन्मान केला गेला.

स्पर्धा कमिटीचे कामकाज श्री प्रवीण साळूखे, अनिल नाईक, श्री गजेंद्र भुसाणे यांनी केले. स्पर्धाचा बक्षीस वितरण सोहळा र ना राऊत विद्यालयच्या मैदानावर पार पडला. क्रीडा स्पर्धाच्या बक्षीस वितरणासोबत या ठिकाणी चालू आर्थिक वर्षात डाक विभागात विविध कामकाजात उत्तम योगदान दिलेल्या कर्मचारी वर्गाचा झालेला गौरव हा सर्व कर्मचारीवर्गासाठी सुखद धक्का होता. त्याप्रसंगी डाक अधीक्षक सुनील थळकर, साह्य. अधीक्षक सुनील पवार, पोस्ट मास्टर गजेंद्र भुसाणे, डाक निरीक्षक धनराज उमाळे, डाक निरीक्षक सचिन शेंडे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज अंबुरे, समीर म्हात्रे, नीलेश नागरगोजे, माधव मुंडे, जयवंत नाकती, संजय पालकर, ज्ञानेश राजे, नागेश साखरकर, संतोष चिपळूनकर, नीलिमा पाटील, विशाल पाटील, सोमनाथ आकरीक, विकास मेघवाल यांनी विशेष मेहनत घेतली.

Exit mobile version