| आगरदांडा | प्रतिनिधी |
राष्ट्रीय सुरक्षा दिनाचे औचित्य साधून सोमवारी (दि.4) केंद्र सरकार व महावितरण कंपनीने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून मुरुड महावितरण उपविभागमध्ये कार्यरत असलेल्या वीज जनमित्र व भगिनिंचे त्यांनी केलेल्या वर्ष भरातील कामाचा व कार्याचा गौरव व कौतुकाची थाप देऊन कामात प्रोत्साहित करण्यासाठी (दि.4) मार्च हा दिवस लाईन मन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. महावितरण व्यवस्थेत लाईनमन हा मुख्य घटक असून वीज पुरवठा सुरळीत व अविरत सुरू ठेवण्यासाठी महत्वाचे काम करीत असतात. लाईनमन ऊन, पाऊस व थंडी याची तमा न बाळगता अहोरात्र मेहनत घेऊन वीज पुरवठा अविरत सुरू राहण्यासाठी झटत असतात.त्यांच्या या कार्याला सलाम करण्यासाठी हा विशेष दिवस साजरा केला जातो. यावेळी मुरुड उपविभागतर्पे प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. मुरुड वीज कार्यालय ते बाजार पेठ, नगरपरिषद आदी मार्गाने ही फेरी काढण्यात आली.
यावेळी मुख्य कार्यालय येथे कार्यरत लाईनमन बंधू भगिनी यांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपकार्यकारी अभियंता कृष्णत सुर्यवंशी, सहाय्यक अभियंता राजेश गोरले, कनिष्ठ अभियंता सतीश खरात, भरत पाटील, संदेश हांडे, कासीम शेख, परमानंद बैकर आदी मान्यवर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.