राष्ट्रीय ‘हिपॅटायटीस’ दिन साजरा

। सिंधुदुर्ग । प्रतिनिधी ।

जागतिक हिपॅटायटीस दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात दि. 22 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान जिल्हास्तरीय पंधरवडा उपक्रम साजरा करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्गच्या नर्सिंग स्कूल द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी हिपॅटायटीस संदर्भात जनजागृती होण्यासाठी विविध प्रकारचे माहिती फलक घेऊन विद्यार्थ्यांनी फेरीत सहभाग घेतला होतो. पथनाट्यामधून जिल्ह्यामध्ये बसस्थानके, शासकीय कार्यालय जिल्हा परिषद सिंधुदुर्ग कॉलेज ऑफ फार्मसी, शिवाजी इंग्लिश स्कूल, पणदूर हायस्कूल या ठिकाणी पथनाट्य सादरीकरण करून नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती करण्याचे काम केले. जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्याम पाटील, डॉ. सुबोध इंगळे, नीलेश गावडे, दयानंद कांबळी, जिल्हा कारागृह अधीक्षक श्री. लटपटे तसेच नर्सिंग स्कूल येथून एस. जी. म्हाकले, एस. एस. आंबेरकर, एच. आर. प्रभू, पी. पी. गायडोळे, जी. जे. झोरे, बी. आर. गिरी, राजेश पारधी, सुनील धोणुकशे, समीर तडवी, राजाराम फाळके आदी उपस्थित होते.

Exit mobile version