| पेण |वार्ताहार |
पेण शहरांतील राम-सीता कॉम्प्लेक्स येथे राहुल धारकर यांचा 24 वा स्मृतीदिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रथम राहुल धारकर यांच्या प्रतिमेस हार घालून दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यांच्या 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आई डे केअर (मतिमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्याला) तन्मय प्रमोद मोकल यास वार्षिक शालेय खर्चासाठी वसुधा पाटील यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष संतोष श्रृंगारपुरे, माजी उपनगराध्यक्ष वसुधा पाटील, माजी नगरसेवक मंगेश पेडामकर, पांडूरंग जाधव, आनंद जाधव, आई डे केअर संस्थाच्या मोहिते, कृष्णा भोईर, विशाल फडके, विजय शहा, यांच्यासह मोठया संख्येने राहुल धारकर यांचे अनुयायी हजर होते.







