कोकण कट्टाचा वर्धापन दिन साजरा

| रसायनी | वार्ताहर |
कोकणवासीयांच्या सामाजिक विकासासाठी सन 1999 मध्ये स्थापन झालेल्या कोकण कट्टा या संस्थेचा 23 वा वर्धापन नुकताच पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या सहा मान्यवरांना कोकणरत्न 2022 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रसायनीनजीकच्या कर्नांळा बांधनवाडी येथील ग्रामसंवर्धन संस्थेसोबत काम करत येथील आदीवासी विद्यार्थ्यांना वेळोवेळी शैक्षणिक साहित्य पुरविण्याचे काम कोकण कट्टा करीत आहे.

याप्रसंगी श्री स्वामी समर्थ विलेपार्ले मठ, सेवाई संस्था, मुंबईचा पेशवा, स्वामी हडपिड मठ, वात्सल्य ट्रस्ट, ग्राम संवर्धन, वंकास डहाणू ग्रामस्थ, नाना शंकरशेट प्रतिष्ठान, वीर सावरकर सेवा केंद्र, पारले वेल्फेअर आणि तमाम पार्लेकर यांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थापक अजित पितळे, सचिव सुनिल वनकुंद्रे, दादा गावडे, खजिनदार सुजीत कदम, विवेक वैद्य, हर्षल धराधर, आत्माराम डीके, प्रथमेश पवार आदि सदस्य यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version