पीएनपी महाविद्यालयाचा वर्धापन दिन साजरा

। अलिबाग । प्रतिनिधी ।

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक विभागांतर्गत नुकताच महाविद्यालयाचा 20 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या अहवाल वाचनामधून डॉ. नम्रता पाटील यांनी महाविद्यालयाचा चढता आलेख अचूक शब्दांत मांडला. महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विद्यार्थी हे महाविद्यालयाचा कणा असून, विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांनी आपले अस्तित्व निर्माण करण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून विद्यार्थी कसे भविष्यात उत्तुंग भरारी घेतील यासाठी मार्गदर्शन केले.

1 ऑगस्ट 2024 रोजी श्री नानासाहेब धर्माधिकारी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेज गोवे-कोलाड येथे पार पडलेल्या मुंबई विद्यापीठातील युवा महोत्सवात सहभागी झालेल्या तसेच यश संपादन केलेल्या तन्वी पाटील (ग्रुप ए) आणि इकरा गोंडेकर (ग्रुप इ) कथाकथन स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक, कृतिका पाटील (ग्रुप ए) एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक, रोहित भालेराव वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट सोलोमध्ये प्रथम क्रमांक, सायली पाटील व प्रार्थना बेटकर (ग्रुप ए) वादविवाद स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ, पलक कारानी व इकरा गोंडेकर (ग्रुप इ) वादविवाद स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक, सायली पाटील (ग्रुप ए) वक्तृत्व स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक, प्रार्थना बेटकर (ग्रुप इ) द्वितीय क्रमांक, दिव्या थळे मेहंदी डिजाइनमध्ये उत्तेजनार्थ अशी एकूण नऊ पारितोषिके प्रदान केली. महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी वेदांत कंटक तसेच अभिषेक पाटील, वृंदावन, अनिकेत, प्रतीक पानकर यांचे विशेष मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. या सर्व विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी रोहित भालेराव, इकरा गोंडेकर, कृतिका पाटील, आर्या भगत, कनिष्ठ महाविद्यालयातील सृष्टी पाटील, प्रा. दिनेश पाटील, शलाका पंडित यांनी आपली कला सर्वांसमोर सादर केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागातील तन्वी पाटील, पलक करानी या विद्यार्थिनींनी, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रसिका म्हात्रे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी चैत्राली पाटील, सुयोग आंग्रे, हर्ष थळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पाटील, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version