कर्तृत्वत्वान महिलांचा सत्कार

| सुतारवाडी । वार्ताहर ।
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या महिला विभागातर्फे तेली समाजातील कर्तृत्वत्वान महिलांचा सत्कार समारंभ व महिला मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या जिल्हा अध्यक्षा संज्योत चालेकर यांनी दुर्वा पॅलेस आक्षी येथे उपस्थित करण्यात आला. यावेळी सामाजिक-राजकिय क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या महिलांना गौरविण्यात आले.

कार्यक्रमास डॉ. सतिश वैरागी, शालिनी निगडे, ऋषिता तावडे, सुचिता साळवी आदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संज्योत चालेकर, सारिका धोत्रे, कांचन वाचकवडे, भारती सुरळकर, भारती निगडे, भारती कटके, सीमा टेकावडे, मयुरी राऊत, सुलभा महाडिक आदींनी मेहनत घेतली. आभार सारिका धोत्रे यांनी मानले.

Exit mobile version