| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
अपर्णा शहा संस्थापित ”ईट प्ले रीड” ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. ईट प्ले रीड संस्थेच्या संस्थापक अपर्णा शहा यांच्या मार्गदर्शनाखाली ईट प्ले रीडच्या राजदूतांसह सर्व भावना ग्रुपमधील सहकाऱ्यांनी सोबत येत योग दिवस साजरा केला. जेणेकरुन शरीराला उत्साह आणि एनर्जी मिळावी.
ईट प्ले रीडच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यक्रम राबवले आहेत. अनेकांना मदतीचा हात दिला आहे. इट प्ले रीडचा हा उल्लेखनीय प्रयत्न मोठ्या प्रमाणावर समुदायाकडून मान्यता आणि समर्थनास पात्र आहे. सकारात्मकतेचा एक लहरी प्रभाव निर्माण करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांच्या कार्यामागे एकत्र येऊ आणि प्रत्येकाने अपर्णा शहाच्या यांच्या सर्वांना फायदेशीर ठरणाऱ्या संस्थेला म्हणजेच “ ईट प्ले रीड ला समर्थन करूया, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्वांनी एकमेकांना योग दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.