श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन शहरात सध्या तटकरे कुटुंबियाचे निकटवर्तीय कोण अशी अघोषित स्पर्धा सुरू असुन त्यासाठी सगळे नियम धाब्यावर बसवून श्रीवर्धनची ग्रामदेवता सोमजादेवी मंदिरात विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी दणक्यात साजरा केल्यामुळे तटकरे समर्थकांना ही घटना अभिमानास्पद वाटत असली तरी भाविकांमधे नाराजी पसरली आहे.
शहरातील उत्साही कार्यकर्त्यांनी अनिकेत तटकरे यांचा देवस्थांनाचे पुर्वापार चालतं आलेले सांस्कृतिक सोहळे,नियमांचे पालन न करता मंदिरात केक कापून वाढदिवस साजरा केला.तटकरे समर्थकांना श्री सोमजादेवी मंदिरातील तटकरे यांचा साजरा केलेला वाढदिवस हा अभिमानास्पद वाटतं असला तरी भाविकांमधे नाराजी पसरली आहे.