। रेवदंडा । वार्ताहर ।
लोकनेते अँड दत्ता पाटील यांची पुण्यतिथी रेवदंडा को.ए.सो.चे स.रा.तेडूलकर विदयालयात साजरी करण्यात आली.रेवदंडा को.ए.सो.च्या स.रा.तेडुंलकर विदयालयाच्या प्रागणांत लोकनेते अॅड दत्ता पाटील तथा दादा यांच्या पुण्यतिथी निमित्त उपस्थित मान्यवर शाळेच्या चेअरमन सरोज वरसोलकर, शाळा समिती सदस्य पारसमल जैन, रेवदंडा ग्रा.प.सरपंच मनिषा चुनेकर, माजी सरपंच विजय चौलकर, माजी उपसभापती संदिप घरत, माजी पंचायत समिती सदस्या संगिता पाटील, शेकापक्षाचे कार्यकर्ते संतोष मोरे, शरद पाटील, शरद वरसोलकर,मधूकर पाटील, जनार्दन भगत,स्नेहल म्हात्रे,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिवादन करून श्रध्दाजंलीवाहीली.