नाबार्ड स्थापना दिनाचे औचित्य; श्रीवर्धन येथे हळदीकुंकू कार्यक्रम

। श्रीवर्धन । वार्ताहर ।

नाबार्ड स्थापना दिनाच्या औचित्याने राष्ट्रीय कृषी, ग्रामीण विकास बँक आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक आणि डिजिटल साक्षरता अभियान, भैरवनाथ पाखाडी, श्रीवर्धन येथे नुकतेच आयोजित करण्यात आले होते.

यानिमित्ताने महिला मेळाव्यात हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात येऊन महिलांना भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी महिलांना गुगल पे आर्थिक आणि डिजिटल साक्षरता अभियानाची माहिती देण्यात आली. लोन सेव्हिंग, रिकरींग मुदत ठेवी, महालक्ष्मी ठेव योजना, महिला बचत गट ठेवी, विविध प्रकारची कर्जविषयक माहिती देण्यात आली.

सदरचे कार्यक्रमाला बँकेच्या श्रीवर्धन शाखेच्या शाखाधिकारी व्ही.बी. खडतर, शाखा निरीक्षक एल.जी. रिकामे, अकाऊंटंट एस.आर. अपराध, कॅशियर ए.एस. कवाडे, क्लार्क एस.एम. गोविलकर, स्वीपर जे.जे. भोसले, बी.एस. सातारकर, सचिव ए.आर. विचारे व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Exit mobile version