तळा येथे निपुण उत्सव साजरा

| तळा | वार्ताहर |

रा.जि.प.शिक्षण विभागाच्या आदेशाप्रमाणे तळा पंचायत समिती शिक्षण विभागाने निपुण भारत अभियानांतर्गत मंगळवारी (दि.19) कन्या शाळा तळा सभागृहात निपुण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक केंद्रातून निपुण भारत अंतर्गत भाषा, गणित, शैक्षणीक साहित्य तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम सादरीकरण करणे तसेच शिक्षकांसाठी निंबध स्पर्धाचे आयोजन करुन ‘माझी निपुण शाळा’ व असे ‘आम्ही निपुण झालो’ हे निंबधाचे विषय होते.

शिक्षकांना निबंधाच्या विषयातून व शैक्षणीक साहित्य निर्मीतीचे प्रगतीमधून निबंध स्पर्धा घेऊन मितल सुहास वावेकर प्रथम, भुषण गंगाधर जाधव द्वितीय तर चेतन नारायण जगताप याला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. शैक्षणीक साहित्य निर्मीती स्पर्धेत भाऊसाहेब शेकू पवार प्रथम, पुनम विजय खैरनार द्वितीय, मितल सुहास वावेकर हिला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. याप्रसंगी सुरेखा तांबट, दिपक ठाकूर, सचिन म्हात्रे, सचीन खंडागळे, गौतम मनवर, सुधीर जाधव, लियाकत राऊत उपस्थीत होते.

Exit mobile version