| उरण | प्रतिनिधी |
उरण शहराच्या जनतेने दिलेल्या भरघोस पाठिंब्यावर मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.23) उरणमध्ये भव्य विजयोत्सव, मिरवणूक आणि विजयी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. कोटनाका राघोबा मंदिर ते एन.आय. हायस्कूल असा रॅली मार्ग निश्चित करण्यात आला आहे. या रॅलीद्वारे उरण शहरात विजयाचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. रॅलीनंतर एन. आय. हायस्कूल मैदानावर विजयी सभा होणार आहे.
या विजयी रॅलीला राज्याच्या राजकारणातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती लाभणार असून, खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा), खासदार संजय पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहीत पवार, ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे, तसेच माजी आमदार मनोहर भोईर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या रॅलीत नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व विजयी नगरसेवक सहभागी होणार आहेत. एकीकडे विजयाचा हा उत्सव साजरा होत असताना, दुसरीकडे उरणकरांच्या मनात विकासाबाबतचे जळजळीत प्रश्न अधिक तीव्र होत चालले आहेत. विजय मिळाला, पण उरणच्या प्रश्नांचे पुढे काय? असा थेट सवाल आता जनतेकडून सत्ताधाऱ्यांना विचारला जात आहे.
विजयाचा जल्लोष उरणच्या रस्त्यांवर
