सिमेंटचा ट्रक उलटला चालक जागीच ठार

| खोपोली | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर खोपोली एक्झिटजवळ सिमेंटच्या ट्रकने समोरील ट्रकला धडक देऊन हा ट्रक उलटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रकमधील चालक सूर्यकांत कांबळे, रा. कर्नाटक हा जागीच ठार झाला आहे. अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सिमेंटच्या गोणी रस्त्यावर पडल्या आहेत.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर अपघाताची मालिका सतत सुरूच असून, शुक्रवारी दुपारी पुण्याहून मुंबईकडे सिमेंट घेऊन जाणार ट्रक हा बोरघाटात खोपोली एक्झिटजवळ आला असता चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने समोरील ट्रकला पाठीमागून धडक देऊन ट्रक रस्त्यावर पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रकमधील चालक जागीच ठार झाला, तर ट्रकमधील सिमेंटच्या गोणी रस्त्यावर पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Exit mobile version