| पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा भेरवचा शताब्दी महोत्सव रविवारी (दि.31) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन अतिष सागळे, रमेश सागळे, अमर सागळे, रूपेश मोरे, काशिनाथ सागळे, संदीप सागळे, सुधीर सागळे, सुधीर नेमाणे, शाळा व्यवस्थापन समिती भारती सागळे, मुख्याध्यापक रश्मी लखीमले, शिक्षिका जान्हवी दंत तसेच आजी-माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी, ग्रामस्थ मंडळ भेरव यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी भेरव, वाफेघर, खुरावले, चिवे, आवंढे, वाघोशी, कुंभारघर, कवेले, तोरणपाडा, खांडपोली व कामथेकरवाडी या गावातील आजी व माजी विद्यार्थी व जेष्ठ नागरिक उपस्थित होते. ‘माझे गाव माझा अभिमान/माझी शाळा माझा स्वाभिमान’ हे ब्रीद शताब्दी महोत्सवावेळी सर्वांनी प्रत्यक्षात आणले.
यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागिकांचा सन्मान चिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रमातून आपल्या कला सादर करून उपस्थित मान्यवरांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाला प्रमुख पाली पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक श्री. बालवाडकर, ज्येष्ठ नागरिक अर्जुन सागळे, केंद्रप्रमुख रासळ राजेश गायकवाड, दिपक पवार, उद्योजक संजय सागळे, रमेश सागळे, उद्योजक व पाली नगरपालिकेचे नगरसेवक पराग मेहता, सर्व ज्येष्ठ शिक्षक, पत्रकार अमित गायकवाड, सतीश देशमुख, मुख्याध्यापिका रश्मी लखिमळे, व्यवस्थापक शाळा कमिटी भैरव आदींसह विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक राजेश गायकवाड यांनी केले.