केंद्रशासनाची इंधनदरात कपातीची मलमपट्टी

पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
। सातारा । वृत्तसंस्था ।
आगामी काळात होणार्‍या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकार इंधनदरात कपातीची मलमट्टी करत आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, पोटनिवडणुकीत झालेल्या दारूण पराभवातून बोध घेऊन केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुळात भरमसाठ करवाढ करून मोदी सरकारने पेट्रोल डिझेलवरील एक्साईज ड्युटीतून 23 लाख कोटी रूपये कमविले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
याशिवाय ते म्हणाले की, केंद्र सरकारने काही दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या करातून कमावले पैसे किसान सन्मान व इतर गोष्टींकरता वापरले जात आहेत. नागरिकांच्या खिशातून एका बाजूने पैसे काढून दुसरीकडे तेच पैसे देताना आम्ही पैसे दिल्याचा आव सरकार आव आणत आहे.

Exit mobile version