सिमेंट व्यापाऱ्याकडून केंद्र सरकारची फसवणूक

14 दिवसाची न्यायालयीन कोठडी

| जळगाव | वृत्तसंस्था |

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील नामदेव धनगर नावाचा व्यापारी सिमेंट व्यवसाय करत असल्याचे दाखवून त्या माध्यमातून खोटी बिले देऊन शासनाची करोडो रूपयांची फसवणूक करत असल्याचे जीएसटी विभागाच्या अन्वेषण शाखेच्या नजरेस आले. या व्यापाऱ्यावर तब्बल दोन महिने पारख ठेवून, ठोस पुरावे हाती येताच नामदेव धनगर याला अटक करण्यात आली आहे.

या तपासणी दरम्यान असे लक्षात आले की, करदाते मे. स्वामी ट्रेडिंग कंपनीचे मालक नामदेव दौलत धनगर यांनी प्रत्यक्षात कुठल्याही मालाची विक्री न करता खोटी बिले देऊन बनावट कर वजावटीचा पुरवठा केला होता. नामदेव दौलत धनगर याने तब्बल 65 कोटीची खोटी बिले देऊन शासनाची 12.65 कोटी रुपयांची कर महसूल हानी केल्याचे उघडकीस आले आहे. कर चुकवेगिरीसाठी अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने धनगरला 14 दिवसापर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

वर्षभरातील सातवी अटक
महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची आर्थिक वर्षातील ही सातवी अटक असून विभागाने खोट्या कर वजावटीचा दावा करणाऱ्या व खोटी बिले देऊन कर चुकवेगिरी करणाऱ्या करदात्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
Exit mobile version