। हमरापूर । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील जिते केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धा बळवली येथील राजिप शाळा येथे संपन्न झाल्या. या क्रीडा स्पर्धामध्ये केंद्रातील सर्व शाळांनी सहभाग घेतला होता. या वर्षी नव्यानेच घेण्यात आलेल्या लगोरी व बेचकीने नेम धरणे या खेळांमध्ये आदिवासी मुलांनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर, सालाबादप्रमाणे राजिप खारपाडा शाळेने चॅम्पियनशिप पटकावली असून बलवली शाळेने देखील आपले स्थान उच्च स्थानावर ठेवले आहे. तसेच, केंद्रातील जिते, आंबिवली, गोविर्ले, वडमालवाडी, दुष्मी, ठाकुरपाडा, खैरासवाडी या शाळांनी सुद्धा बक्षिसे मिळवली आहेत. या स्पर्धा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री सावंत, शिक्षक वृंद व शाळा व्यवस्थापन कमिटी व केंद्रातील सर्व शिक्षक वृंद यांनी मोलाचे सहकार्य केले.