विनातिकीट प्रवाशांची धरपकड

200 प्रवाशांवर दंडात्मक कारवाई; 40 हजार रुपये दंडाची वसुली

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ स्थानक ते खोपोली स्थानकादरम्यान विनातिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांवर मध्य रेल्वेने कारवाई केली. वाणिज्य निरीक्षक शिरीष कांबळे यांनी यासाठी पुढाकार घेऊन सर्व तिकीट तपासनीस यांच्या मदतीने मध्य रेल्वेच्या महसुलात भर टाकली.

सुमारे सरासरी 200 प्रवाशांकडून 40 हजार 100 रुपये दंड मध्य रेल्वेने मुख्य वाणिज्य निरीक्षक शिरीष कांबळे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तिकीट तपासणीस यांनी रेल्वे प्रशासनाकडे जमा केला तसेच सर्व स्थानिक पातळीवर विनातिकीट प्रवास करू नये यासाठी आवर्जून सर्वांना संबोधन करण्यात आले. शिरीष कांबळे यांच्या प्रामाणिक कार्यासाठी अनेक स्थानिक पातळीवर प्रत्येक स्तरातून प्रशंसा करण्यात येत आहे. तसेच अशा प्रामाणिक प्रयत्नांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी कौतुकदेखील करण्यात येत आहे.

13 नोव्हेंबर रोजी लोणावळा विभागाचे मुख्य वाणिज्य निरीक्षक शिरीष कांबळे यांच्या सहकार्याने नेरळ ते खोपोली रेल्वे स्थानकांदरम्यान सकाळी 9 ते 12 वाजेदरम्यान तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. यावेळी सुमारे 151 विनातिकीट रेल्वे प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 151 विनातिकीट रेल्वे प्रवाशांकडून सुमारे 34 हजार 90 रुपये दंड वसूल केला. विनातिकीट प्रवास करुन आपली तसेच आपल्या देशाची फसवणूक करु नका. योग्य तिकीट काढून आपला प्रवास सुनिश्‍चित व सुरक्षित करा, असे आवाहन शिरीष कांबळे यांनी यावेळी केले.

Exit mobile version