आंबेवाडी नाका येथे साखळी उपोषण सुरु

महामार्गाच्या कामात मनमानी

| कोलाड | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील आंबेवाडी कोलाड वरसगांव येथील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला 200 मीटर अंतरावर अंडरपास बोगदे देण्यात यावे, सर्व्हिस रोडचे काम आजपर्यंत पुर्ण झाले नाही ते काम पूर्ण करून देणे, गटारावरील झाकणे बसवून देणे, तसेच सदर अंडरपास पेण, नागोठणा, लोणेरे, महाड येथे ठेवले आहेत मग आंबेवाडी कोलाड वरसगाव आमच्या वरच अन्याय का? अशा विविध मागण्यासाठी आंबेवाडी बाजारपेठेतील द. ग. तटकरे चौकात आंबेवाडी कोलाड वरसगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी सोमवारी (दि.5) साखळी उपोषण सुरु केले. जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत हे उपोषण सुरुच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

याप्रसंगी आंबेवाडी ग्रामपंचायततीचे माजी सरपंच सुरेश महाबळे, चंद्रकांत लोखंडे, गणेश शिंदे, महेंद्र वाचकवडे, संजय कुर्ले, दयाराम पवार, चंद्रकांत जाधव, समीर महाबळे, बबलु सय्यद, भाऊ गांधी, शब्बीर सय्यद, विजय बोरकर, मंगेश सरफळे, उदय खामकर, विश्वास बागुल, विष्णु महाबळे, बिंदास धनावडे, नाना शिंदे, रविंद्र मामळुस्कर, तुकाराम सानप, बाळा हाडके, दगडू हाटकर, महादेव लोखंडे, तसेच असंख्य व्यापारी, कोलाड परिसरातील असंख्य मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

आंबेवाडी वरसगांव नाका हे मध्यस्ती ठिकाण असून येथे विळा ते कोलाड, इंदापूर ते कोलाड, रोहा ते कोलाड, तसेच खांब ते कोलाड, चिंचवलीतर्फे अतोणे ते कोलाड या चारही बाजूनी असंख्य नागरिक ये-जा करीत असतात, परंतु कोलाड येथे अंडरपास रस्ता नसल्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना एक किलोमीटर अंतरावर पुढे जाऊन वलसा घालावे लागत असल्यामुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

– सुरेश महाबळे
माजी सरपंच, आंबेवाडी

आंबेवाडी नाका येथे 72 खेडेगावातील नागरिक ये-जा करीत असतात. परंतु, येथे अंडरपास रस्ता नसल्याने येथील नागरिक, व्यापारी, रिक्षा, मिनिडोअर, टेम्पो चालक याच्या अडचणी वाढत आहेत.

– विश्वास बागुल
कुणबी समाज युवानेता

Exit mobile version