सार्वजनिक वाचनालयात चैत्रसंध्या

। कोर्लई । वार्ताहर ।

मुरुड जंजिरा रायगड वाचनालय मुरुडतर्फे गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र-संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुण्या दिपाली दिवेकर, दिपाली जोशी, संजयज गुंजाळ, अरूण बागडे, उषा खोत, नैनिता कर्णिक, विनय मथुरे, उत्कर्षा गुंजाळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन सरस्वती पूजन व ग्रंथपूजन करण्यात आले. दिपाली जोशी यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाची रूपरेषा, गुढीपाडव्याचे महत्त्व, वसंतोत्सव महत्व विशद केले. रिध्दी भगत हीने आपल्या कविता द्वारे चैत्र पाडव्याचे गुढी उभारण्याचे महत्त्व सांगितले. नैनिता कर्णिक यांनी भाई दिवेकर यांची गुढीपाडवा संकल्प कविता वाचून दाखवली. उषा खोत यांनी चैत्र महिन्यातील झाडांविषयी महत्व कवितेद्वारे विशद केले. संजय गुंजाळ यांनी चैत्र महिन्यातील हिंदूचे सण व त्या पाठीमागील विज्ञान याविषयी प्रतिपादन केले.

Exit mobile version