। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
मुंबई-गोवा हायवे वरील कोलाड पुई गावानजिक असलेल्या महिसदरा नदीवरील पुलावर एका मालवाहू ट्रेलरचा टायर पम्पचर झाल्यामुळे या महामार्गांवर सकाळी दहा वाजता वाहतूक चक्का जाम झाला मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती यामुळे प्रवाशीवर्गासह वाहन चालकांना ताटकळत उभे राहून उष्णतेचा सामना करावा लागल्याने एकच या मार्गाबाबत संताप व्यक्त केला जात होता..
महिसदरा नदीपत्रावतील पूल हा पुर्ण जीर्ण झाला असून हा पुल वाहतुकीसाठी पूर्णपणे धोकादायक आहे. अशा प्रकारचे वृत्त सर्वच वर्तमान पत्रातून अनेक वेळा प्रकासित झाल्यानंतर महिसदरा नदीवरील नविन पुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून बनविण्यासाठी सुरवात केली पण नदीच्या दोन्ही बाजूचा खालचा पाया खोदून तो अर्धवट स्थितीत ठेवला आहे.दोन वर्षे झाली तरी या पुलाचे काम तसेच अर्धवट अवस्थेत आहे ते ठेवून नंतर जीर्ण अवस्थेत असलेल्या जुन्या पुलाच्या डागडुगिच्या कामाला सुरुवात केली असून त्याला बाहेरून प्लास्टर करून नवीन करण्याचा प्रयत्न सुरु आहे तर साईड संरक्षण कठडे देखील बसवत आहेत परंतु अगोदरच अरुंद पुल व जीर्ण झालेला पुल किती दिवस टिकेल याची खात्री देता येत नाही यामुळे प्रवाशी वर्गाच्या जिवाचा खेळ हा कायमच असल्याचे बोलले जात आहे.