। कोर्लई । वार्ताहर ।
ओबीसी जनमोर्चा ची सहयोगी संस्था असलेल्या रायगड जिल्हा ओबीसी संघर्ष समन्वय समिती उपाध्यक्षपदी चक्रधर ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माणगाव येथील 24 एप्रिल रोजी झालेल्या रायगड जिल्हा ओबीसी संघर्ष समन्वय समितीची जिल्हा कार्यकारणीची सभा संपन्न झाली, या सभेत ओबीसी जनमोर्चा अध्यक्ष रायगड जिल्हा अध्यक्ष प्रकाशअण्णा शेडगे, ओबीसी संघर्ष समन्वय समिती अध्यक्ष चंद्रकात बावकर यांच्या हस्ते रायगड जिल्हा ओबीसी संघर्ष समिती उपाध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र चक्रधर ठाकूर यांना देण्यात आले.






